AAI Bharti 2020 – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) ने ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या विविध पदांवर व्हेकन्सी जाहीर केली आहे. यासाठी aai.aero यावर नोटिफिकेशन काही दिवसआधीच जाहीर करण्यात आलं आहे. ३ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.
पदांची माहिती
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल इंजिनीअरिंग) – १५ पदे
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – १५ पदे
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – १५० पदे
एकूण पदांची संख्या – १८०
अर्जांची माहिती
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ ऑगस्ट २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २ सप्टेंबर २०२०
अर्जाचे शुल्क
एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज नि:शुल्क आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्जाचे शुल्क ३०० रुपये आहे.
आवश्यक पात्रता
संबंधित शाखेतील इंजिनीअरिंगची पदवी आवश्यक. याव्यतिरिक्त गेट २०१९ चा स्कोअर अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
सामान्य आणि आर्थिक वंचित गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २७ वर्षे आहे. आरक्षण नियमानुसार, विविध गटातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत १५ वर्षांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For AAI Recruitment 2020 | |