Maharashtra Shikshak Bharti 2020 – आनंदाची बातमी म्हणजे, तीन वर्षांपूर्वी घोषित केलेली आणि वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती न्यायालयीन कचाट्यातून सुटल्यावरही कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.
कोणी भरावे प्राधान्यक्रम
- आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
- ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
- तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
- ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.
प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.
Primary teacher